कोल्हापूर : कल्याण निधी योजना ठरली वारसांना आधारवड

नैसर्गिक, अपघाती मृत्यूसह अपंगत्व आल्यास मिळते सहाय्य
कोल्हापूर : कल्याण निधी योजना ठरली वारसांना आधारवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कल्याण निधी योजनेतून वर्षभरात नैसर्गिक, आकस्मिक मृत्यू व अपंगत्वाच्या १९७ प्रकरणांत १ कोटी ७० लाख रुपये निधी दिला आहे. दोन वर्षांतला हा आकडा २ कोटी ६३ लाख इतका असून, २०१९-२० ला ५९ प्रकरणांत ६६ लाख रुपये दिले. विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्याचा नैसर्गिक, आकस्मिक व अपघाती मृत्यूसह अपंगत्व आल्यावर हा निधी देण्यात येत असून, विद्यार्थी विकास विभागातर्फे ही योजना राबवली जात आहे.

कोल्हापूर : कल्याण निधी योजना ठरली वारसांना आधारवड
राजकारणात तू कधी उतरणार? बहिणीसाठी काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या सोनू सूदने दिलं उत्तर

ही योजना २०१४-१५ पासून सुरू झाली. त्यात २०१९-२० ला बदल केले. डॉ. सी. टी. कारंडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सूचनांचा अंतर्भाव केला. प्रति विद्यार्थी ५०, शिक्षक २००, प्रशासकीय सेवकास १००, तर ज्यांचा ग्रेड पे सहा हजारांहून अधिक आहे, त्यांच्याकरिता २०० रुपये योजनेंतर्गत आकारले जातात. योजनेतील सहभागी घटकांचा नैसर्गिक अथवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला दीड लाख रुपये कल्याण निधी रक्कम दिली जाते. विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बाहेरगावी जाताना नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास ही रक्कम दोन लाख इतकी देण्यात येत आहे. अपंगत्वाची रक्कम कोणता अवयव निकामी झाला आहे त्यानुसार दिली जाते.

कोल्हापूर : कल्याण निधी योजना ठरली वारसांना आधारवड
UP निवडणुकांसाठी काँग्रेसचा चेहरा कोण? प्रियंका गांधींनी दिलं उत्तर...

विद्यार्थ्याच्या पालकांचा आकस्मिक अथवा नैसर्गिक मृत्यू झाला तर ७५ हजार रुपये, तर पालकाच्या अपंगत्वाकरिताही रक्कम दिली जाते. घटना घडल्यापासून कल्याण निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याची मर्यादा १८० दिवस आहे.

कल्याण निधीसाठी २०२०-२१ मध्ये आलेले प्रस्ताव

(नैसर्गिक व अपघाती मृत्यू)

  • विद्यार्थी - १३

  • पालक - ३२

  • प्रशासकीय सेवक - १२

  • शिक्षक - २

१ एप्रिल २०२१ ते आजपर्यंत १९७ प्रकरणांत १ कोटी ७० लाख रुपये दिले आहेत. योजनेसाठी महाविद्यालयातून प्रस्ताव यावे लागतात. त्याची प्रक्रिया साधी व सोपी आहे. आत्महत्या केल्यास योजनेचा लाभ वारसांना दिला जात नाही.

-डॉ. आर. व्ही. गुरव, संचालक, विद्यार्थी विकास विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com