Kolhapur Accident : कांडगाव जवळ भीषण अपघात; एकजण जागीच ठार

आज सकाळी साडे अकराच्या सुमारास जोराची धडक होवून दुचाकीस्वार जागीच ठार झाला
accident news
accident news
Updated on

हळदी - कांडगाव (ता. करवीर) येथे शासकीय धान्य वाहतूक करणारा ट्रक आणि दुचाकी यांची आज सकाळी साडे अकराच्या सुमारास जोराची धडक होवून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजाराम गणपती कांबळे (वय ४५) (मूळ गाव तळगाव ता. राधानगरी, सध्या रा. सूर्वेनगर, कळंबा, कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कोल्हापूर शहरातील एका महाविद्यालयात कामास होते असे समजते.

accident news
गोंधळात 'गोकुळ'ची सभा सुरु, 'ती समांतर सभा घ्यावी लागणार' : शौमिका महाडिक

धडक एकदम जोरात असल्याने राजाराम कांबळे हे जागीच ठार झाले. दरम्यान दुचाकी चालवताना ते एकटेच होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर बराच वेळ त्यांची नेमकी ओळख पटली नव्हती. थोड्या वेळानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना ओळखले व कांबळे यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी करवीर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil on Gokul election politics
Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Rohini Devaba World Wrestling Championship
Marathi News Esakal
www.esakal.com