
कोल्हापूर : ‘एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना मारहाण करणाऱ्या कन्नड वेदिका संघटनेवर बंदी घालावी, तसेच कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, तोपर्यंत कर्नाटकच्या बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही’, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी आज येथे दिला.