जयसिंगपूर : शहरात सध्या देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूस (Karnataka Mango)आंब्याची विक्री सुरू आहे. अगदी आंब्याचा हंगाम सुरू झाल्यापासूनच ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. शहरात अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत विक्रेते देवगड हापूस (Hapus Mango) आंब्याची विक्री करत असताना बहुसंख्य विक्रेते देवगड हापूसच्या (Devgad Hapus) नावाखाली कर्नाटक हापूसची खुलेआम विक्री करत आहेत.