
पन्हाळा : पोलिसांनी चंदगड, बेळगाव व गुंजानहट्टी (ता. हुक्केरी, कर्नाटक) येथून बकरी चोरांच्या टोळीला अटक केली. अटक केलेल्यांमध्ये परशराम मारुती पवार (वय ३३, रा. तुडये, ता. चंदगड), मोहमद शाहीद मोहमंद गौस काकर (२७ रा.घर नं ४७२४ काकर गल्ली, बेळगाव), महेबूब अब्दुल मुलतानी (५८, रा. गुंजानहट्टी ता. हुक्केरी जि. बेळगाव)या तिघांकडून तीन ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस आणल्या असून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.