karanatak farmers: कर्नाटकात उसदरासाठी पेटलेलं शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होतंय. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, महामार्ग ठप्प झालेत, आणि शासन गप्प आहे. या गोंधळात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे; सीमाभागातील ऊस यंदा सुरक्षित राहिला आहे.
जयसिंगपूर: यावर्षी कर्नाटकात ऊसदराचे आंदोलन चांगलेच भडकले आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असताना महाराष्ट्राच्या सीमाभागातील कारखान्यांना मात्र हे आंदोलन दिलासा देणारे ठरले आहे.