पाच वाजून ५९ मिनिटांनी किरणे कासव चौकात पोहोचली. ६ वाजून २ मिनिटांनी किरणे पितळी उंबऱ्यातून आत आली. ६ वाजून ४ मिनिटांनी किरणांनी चांदीच्या उंबऱ्याला स्पर्श केला.
कोल्हापूर : उत्तरायणामधील किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला (Ambabai Temple Kirnotsav Sohala) जणू सोनसळी अभिषेक केला. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणामध्ये पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याने भाविकांमध्ये समाधानाची भावना होती. हा सोहळा भाविकांनी डिजिटल स्क्रीनवर याचि देही, याचि डोळा अनुभवला. किरणोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांपेक्षा किरणांची क्षमता चौपट वाढल्याने पूर्ण क्षमतेने किरणोत्सव सजला.