Kolhapur Crime News
esakal
सोनाळी : करवीर तालुक्यातील एका गावात प्रीतम प्रकाश कांबळे (वय २५) याने विष पिऊन आत्महत्या केली. आज पहाटे हा प्रकार समोर येताच मुलाच्या नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. प्रेमसंबंधाच्या रागातून (Love Affair Dispute) मानसिक त्रास दिल्यामुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.