32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
esakal
कोतोली : कसबा बोरगाव (ता. पन्हाळा) येथे कासारी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह काल सकाळी नदीतच तरंगताना (Kasaba Borgaon drowning) आढळला. विकास विठ्ठल चौगले (वय ३२) असे त्याचे नाव आहे. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याबाबत लक्ष्मण धोंडिराम चौगले यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली असून, बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.