कोल्हापूर - KDCC अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत सेनेची गुगली | KDCC Bank Chairman Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC Bank Chairman Election

शिवसेनेने पक्षाच्या संचालकांना एकत्र येऊन निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

कोल्हापूर - KDCC अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत सेनेची गुगली

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्ष, (KDCC) उपाध्यक्ष निवडीसाठी सध्या द्रुतगतीने घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनं (Shivsena) सत्ताधाऱ्यांकडे उपाध्यक्ष पदाची मागणी करत या निवडीत रंगत आणली आहे. निवड अगदी दोन ते तीन तासांवर आलेली असताना सत्ता समीकरणाने रंगतदार वळण घेतले आहे. अध्यक्ष पदासाठी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांचे नाव निश्चित असताना शिवसेना आघाडीने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवत, सत्ताधारी आघाडीला पेचात टाकले आहे. शिवसेनेची मागणी मान्य होणार की सत्ताधारी गट आणखी कोणते डावपेच आखूण निवडी बिनविरोध पार पाडणार हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शिवसेनेने पक्षाच्या संचालकांना एकत्र येऊन निर्णय घेण्याच्या सुचना दिल्याने ही निवड नाट्यमय घडामोडींकडे वळली आहे. अर्जुन आबिटकर, बाबासाहेब पाटील यांना उपाध्यक्ष पद देण्याची मागणी केली आहे.(KDCC Bank Chairman Election)

हेही वाचा: मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या पोस्टवर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) व पालकमंत्री सतेज पाटील (Satej patil) हे सत्ताधारी आघाडीच्या संचालकांची बैठक घेत आहेत. तर शिवसेना नेते खासदार संजय मंडलिक हे विरोधी संचालकांची बैठक घेत आहेत. महत्वाचे म्हणजे खासदार मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या बैठकीत सत्ताधारी गटाच्या संचालक निवेदिता माने (Nivedita mane) व आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा: वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के OBC आरक्षण कायम : SC

Web Title: Kdcc Election Chairman Elected Shivsena Orders To Take Decision In Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top