esakal | KDCC : गणपतराव पाटील यांची उमेदवारी शेतकरी हितासाठी; उल्हास पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC Election: आसुर्लेकरांच्या उमेदवारीवरून बिघाडी शक्य

KDCC : गणपतराव पाटील यांची उमेदवारी शेतकरी हितासाठी; उल्हास पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरोळ : ‘जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शेतकरी आर्थिक समृद्ध होण्यासाठी पाटील हेच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात जाणे गरजेचे आहे,’ असे मत माजी आमदार उल्हास पाटील यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान ठरावधारकांसमोर बोलत होते.

हरोली, नांदणी, जयसिंगपूर, उमळवाड, कोथळी, दानोळी, कवठेसार, तमदलगे, निमशिरगाव, चिपरी येथील ठरावधारकांच्या भेटी घेतल्या. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘गणपतराव पाटील यांनी विविध संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. ते जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांची प्रगती कशी होईल, यासाठी प्रयत्नशील राहतील. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी उभे केले आहे. तालुक्‍यात परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून, तालुक्यातील १०० हून अधिक ठरावधारक पाठीशी आहेत.

जि. प.चे माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात असणे आवश्यक आहे. पाटील म्हणाले, ‘‘सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मला ही निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. मीही काही ठरावधारकांसोबत चर्चा केली. त्यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता निवडणूक लढवण्याचा आग्रह केल्याने, निवडणूक लढवणार आहे. कोणाशी माझी राजकीय ईर्षा नाही, द्वेष नाही.’’ यावेळी दिलीप पाटील, जि. प. सदस्य डॉ. अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, शेखर पाटील, सर्जेराव शिंदे आदी प्रमुख उपस्थिती होते.

loading image
go to top