esakal | KDCC : कोरे यांनी मुश्रीफांची भेट टाळली?
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC : कोरे यांनी मुश्रीफांची भेट टाळली?

KDCC : कोरे यांनी मुश्रीफांची भेट टाळली?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार विनय कोरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट आज टाळली असल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्न निर्माण झाला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रक्रिया संस्था गटातील संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या उमेदवारीवरून जिल्हा बँकेतील संभाव्य आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार कोरे यांनी आसुर्लेकर यांना विरोध केला असून, त्यांच्याकडून या गटात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पर्यायी चाचपणी सुरू आहे. यातूनच ठराव दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कोरे यांनी संस्थेचा एक ठराव प्रदीप पाटील यांचे नाव देऊन मत स्पष्ट केले आहे. या संदर्भातच आज मुश्रीफ आमदार कोरे यांना भेटणार होते. मात्रकोरे यांनी एका कार्यक्रमाचे निमित्त सांगून मुश्रीफांची भेट टाळली असल्याचे समजते.

मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत, हे करत असतानाच आघाडीची संभाव्य उमेदवारी कोणाला मिळावी. याबाबतही विचारमंथन केले जात असत आहे. कोरे यांनी आसुर्लेकर यांना विरोध करत प्रदीप पाटील यांचे नाव पुढे आणल्याने. या वादाला तोंड फुटले असल्याचे बोलले जात आहे. याच वादाला पूर्णविराम देण्यासाठी किंवा यावर चर्चा करण्यासाठी श्री. कोरे यांना मुश्रीफ भेटणार असल्याची चर्चा मात्र चर्चा करण्याची टाळल्याचे समजल्यामुळे कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाल्या आहेत.

loading image
go to top