python rescue in Gaganbawada Kolhapur
esakal
गगनबावडा (कोल्हापूर) : खोकुर्ले (ता. गगनबावडा) येथे मानवी वस्तीशेजारी साडेपाच फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. नागरिकांच्या निदर्शनास अजगर आल्यानंतर त्याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आले.