
Kolhapur crime news : केर्ले (ता. करवीर) येथील तिहेरी प्रेम प्रकरणातून खून झालेल्या महेंद्र प्रशांत कुंभार याच्या कुटुंबासह गावातील ४०-५० महिलांच्या जमावाने अल्पवयीन संशयिताच्या मुलाच्या दारात जाऊन शिवीगाळ केली. मंगळवारी दुपारी त्याच्या घरच्यांनी बेकरी उघडल्याच्या कारणावरून महिलांचा जमाव घराकडे गेला होता. गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने महिलांची समजूत काढून महिलांना शांत केले.