
कोल्हापूर : उत्तरायण किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी मावळतीची किरणे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या कंठापर्यंत पोहोचली. यंदा पहिल्या तीन दिवसांतच पूर्ण क्षमतेने किरणोत्सव पूर्ण झाल्याने आजही किरणे देवीवर अभिषेक करतील, अशी आशा होती. मात्र, किरणांनी निराशा करत सहा वाजून १५ मिनिटांनी ती देवीच्या खांद्यावरून कंठापर्यंत पोहोचत डावीकडे लुप्त झाली.