पाच दिवसांच्या किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशीही किरणे गाभाऱ्यात येतील का?, याची चाचपणी देवस्थान समिती व अभ्यासक करत होते.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) बुधवारपासून किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीच मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या कंबरेपर्यंत पोहोचली. सुरूवातीला ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सवात अडथळा निर्माण होईल, अशी साशंकता निर्माण झाली होती. मात्र, शेवटच्या काही मिनिटांमध्ये आडवे आलेले ढग हटले आणि मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत किरणांचा प्रवास सुरू झाला.