esakal | ब्रम्हनाळमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची किट
sakal

बोलून बातमी शोधा

boat

ब्रम्हनाळमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची किट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरढोण : भारत सरकार रजिस्टर्ड मानवसंरक्षण समितीने ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे ११० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कुराडे व राज्याध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह पाच राज्यांचे जनसंपर्क अधिकारी गजानन भगत, पश्चिम महाराष्ट्र संघटक प्रा. राजाराम पाटील, अल्लाबक्ष मुल्ला, अॅड. सुरेखा शिंदे, करमाळा महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया कर्णावर, फलटणचे विशेष कार्यकारी अध्यक्ष फिरोज मोदी यांच्या हस्ते कीटवाटप झाले.

नागजचे मोहन माळी, सरपंच उत्तम बंडगर, उपसरपंच सुजाता पाटील, माजी उपसरपंच वैभव मद्वाण्णा, शिवाजीराव गडदे, गुणधर कर्नाळे, बबन जगदाळे, श्रीपाल सत्याणा उपस्थित होते.निवृत्त शिक्षक, सेवादलाचे प्रमुख सुभाष मद्वाण्णा यांनी स्वागत केले. ग्रामसेवक जगदीश शिंदे यांनी आभार मानले. ब्रम्हनाळमधील नागरिकांच्या सातबारा उताऱ्याच्या संदर्भात ग्रामपंचायतीने मागण्यांचे लेखी निवेदन जनसंपर्क अधिकारी जी. एम. भगत, पश्चिम महाराष्ट्र संघटक प्रा. राजाराम पाटील यांना सरपंच उत्तम बंडगर यांनी दिले.

महापुरातील बोट दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या १७ जणांना श्रध्दांजली वाहण्यात आली. गजानन भगत, प्रा. राजाराम पाटील, सरपंच उत्तम बंडगर यांची भाषणे झाली.

loading image
go to top