esakal | चर्चा तर होणारचं: आमदारांच्या वाढदिवसात पोलीस अधिकाऱ्यांनीच उधळली फुले
sakal

बोलून बातमी शोधा

चर्चा तर होणारचं: आमदारांवर पोलीस  अधिकाऱ्यांनीच उधळली फुले

चर्चा तर होणारचं: आमदारांवर पोलीस अधिकाऱ्यांनीच उधळली फुले

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : कित्तुरचे आमदार महानतेश दोडगौडर यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच त्यांचा पत्नीसमवेत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाला उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केल्याने त्यांची ही उपस्थिती वादाला कारणीभूत ठरली आहे.

आमदार महांतेश दोडगौडर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी बैलहोंगल उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक पी. शिवानंद कटगी, पोलीस निरीक्षक यु.एच. सातेनहल्ली, नेसरगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिगिहल्ली व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदारांच्या वाढदिवस कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी आमदार आणि त्यांच्या पत्नीला एकत्रित बसवून त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी केल्याचा व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर झाला आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी व राजकीय नेते यांच्यातील असलेल्या संबंधांमुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. आमदारावर पुष्पवृष्टी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: NCP काँग्रेसला मदत करणार? BJP ‘ताकही फुंकून पिणार’

कित्तुरचे आमदार महांतेश दोडगौडर यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करणाऱ्या पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

लक्ष्मण निंबरंगी, जिल्हा पोलीस प्रमुख.

loading image
go to top