KMT Bus : बस नादुरुस्त प्रमाण कमी करणार; केएमटीचे ७४ कोटींचे अंदाजपत्रक;आधुनिकीकरणासह विविध उद्दिष्टे

कोल्हापूरच्या परिवहन व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्यासाठी केएमटीने ७४ कोटींचे महत्त्वाकांक्षी अंदाजपत्रक सादर केले आहे. इलेक्ट्रिक बस, स्मार्ट तंत्रज्ञान, शटल सेवा आणि सौरऊर्जेच्या वापरामुळे बस सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न आहे.
KMT buses in Kolhapur set for modernization

KMT buses in Kolhapur set for modernization

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘सीएसआर’मधून प्रमुख बस थांब्यांचे आधुनिकीकरण व सुशोभीकरण, प्रमुख पार्किंगच्या ठिकाणांपासून अंबाबाई मंदिरापर्यंत शटल बस सेवा, डेटा आधारित मार्गाचे नियोजन, ताफा वापर ९० टक्क्यांपर्यंत वाढविणे, बस नादुरुस्तीचे प्रमाण किमान २० टक्क्यांपर्यंत कमी करणे, चालकांना प्रशिक्षण देऊन इंधन खर्चात बचत आदी उद्दिष्टे ठेवलेले केएमटीचे अंदाजपत्रक प्रशासनाने आज मान्यतेसाठी परिवहन समितीकडे सुपूर्द केले. ७४ कोटी १२ लाख महसुली जमेचे अंदाजपत्रक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com