कोल्हापूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोल्हापूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेला गती

कोल्हापूर : सीबीएससी बोर्डचा निकाल शुक्रवारी (ता. २२) जाहीर झाला. त्यानंतर पुन्हा एकदा अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. सीबीएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांचे निकाल पत्रातील गुण बेस्ट ऑफ फाईव्‍ह नुसार करून त्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केले जाईल.

सोमवार (ता. २५) पासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. दहावीचा निकाल लागून एक महिना झाला तरी अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाहीत. केंद्रीय बोर्डाचे निकाल न लागल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबली होती. आता सोमवार (ता. २५) पासून पुन्हा या प्रक्रियेला गती येणार आहे. १३ जुलै पर्यंत ६ हजार ४५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये विज्ञान, वाणिज्य आणि इंग्रजी माध्यमातील वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे.

सोमवारपासून स. म. लोहिया ज्युनिअर कॉलेजमध्ये सीबीएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमधून बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण केले जातील. त्यानंतर या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. आता विद्यार्थी अर्जाचा दुसरा भाग भरायला सुरुवात करणार आहेत. ज्यांनी अद्याप पहिला भाग भरलेला नाही तेही यामध्ये पहिला भाग भरू शकतात. त्यामुळे आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला गती मिळेल.

Web Title: Kolhapur 11th Admission Process Starts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top