Kolhapur : वीज सवलत प्रश्नावर ३० ला बैठक

वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख; आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
kolhapur
kolhapur sakal
Updated on

इचलकरंजी : यंत्रमागासाठीच्या वीजबिल सवलतीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेसंदर्भात ३० सप्टेंबरला आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक बैठक घेऊन स्थगिती देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

आमदार आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग उद्योगांच्या प्रश्नांसंदर्भात इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुंबईत वस्त्रोद्योगमंत्री श्री. शेख यांची भेट घेतली. वीजबिल सवलतीसाठी २७ अश्‍वशक्तीवरील व त्या खालील लघुदाब यंत्रमागधारकांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणीची अट अनिवार्य केली आहे. ती यंत्रमागधारकांना त्रासदायक असल्याने आमदार आवाडे यांनी अट रद्द करण्याची मागणी शेख यांच्याकडे केली. त्यावर शेख यांनी याप्रश्‍नी ३० सप्टेंबरला निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. शिष्टमंडळात इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, संचालक चंद्रकांत पाटील, नारायण दुरुगडे आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com