
Kolhapur: मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेने बडगा उगारला. केवळ ३१ डिसेंबरच्या रात्री दुचाकीस्वारांना अडवून ‘ब्रेथ ॲनालायजर’द्वारे तपासणी दिसून येत होती; परंतु, शहर वाहतूक शाखेने मागील दहा महिन्यात मद्यपी चालकांकडून ८ लाख ४६ हजारांचा दंड वसुल केला आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्याचा ताबा सुटून वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा चालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार कारवाई केली जाते. मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका शहर वाहतूक शाखेने सुरू केला आहे. शहरात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मागील दहा महिन्यात विशेष मोहिमांद्वारे कारवाई करण्यात आली.