
Woman Cremated Mistakenly : बेपत्ता महिलेचा मृतदेह समजून कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण, घडले मात्र विपरीतच. ज्या महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले तीच महिला साक्षात गावात हजर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसही चक्रावले. घडल्या प्रकाराची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.