कोल्हापूर : थेट पाईपलाईन कामाची प्रशासकांकडून पाहणी

मिमी व्यासाच्या गुरुत्व वहिनी पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली.
 पाईपलाईन
पाईपलाईन sakal

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आज पाहणी केली. ठिकपुर्ली, सोळांकूर येथील कामाचा आढावा घेतला. डॉ. बलकवडे यांनी ठिकपुर्ली सुरू असलेले गॅप क्लोजिंगच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेडचे प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी यांना सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करून कामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी सोळांकुरातील १८०० मिमी व्यासाच्या गुरुत्व वहिनी पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली.

येथे एकूण २०० मीटरपैकी ११४ मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरू असून, सदरचे काम साधारणत: दहा दिवसांमध्ये पूर्ण होईल, असे माळी यांनी सांगितले. यावेळी सरपंच आर. वाय. पाटील यांनी उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासकांशी चर्चा केली. यानंतर काळम्मावाडी धरणामधील जॅकवेलच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. कॉपर डॅममधील पाणी पातळीची पाहणी केली. नंतर ब्रेक प्रेशर टॅंकमध्ये सध्या टेस्टिंगसाठी पाणी भरण्यात येत असून, स्टेअरकेसचे काम सुरू आहे. उर्वरित कामे किती कालावधीमध्ये पूर्ण करणार याबाबतचे नियोजन करण्याबाबत निर्देश दिले. जल अभियंता हर्षजित घाटगे, शाखा अभियंता संजय नागरगोजे, सल्लागार युनिटी कन्सल्टंटचे प्रतिनिधी विजय मोहिते, आर. बी. पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com