esakal | कोल्हापुरात दुकाने उघडण्याबाबत आज निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Merchants will open shops today Decision of Maharashtra Chamber of Commerce covid 19 impact kolhapur marathi news

कोल्हापुरात दुकाने उघडण्याबाबत आज निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: अत्यावश्यक सेवा वगळता सरसकट सर्व दुकाने उघडण्याबाबत उद्या (ता. १६) निर्णय होण्याची शक्यता आहे. दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली नाही, तरी दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम असून, याबाबत राजारामपुरीत व्यापाऱ्यांची बैठक होईल.kolhapur-all-shop-open-decision-maharashtra- chamber-commerce-lockdown-update- akb84

दरम्यान, सरसकट दुकाने उघडण्याबाबत परवानगी मिळावी, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लक्ष घालावे, अशी व्यापाऱ्यांची मागणी असून, त्यांना भेटीसाठी पत्र पाठविले असल्याचे पत्रक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

व्यापाऱ्यांनी आजवर संयम पाळला. सर्वांनी लसीकरणही करून घेतले आहे. त्यामुळे निर्बंधाऐवजी खबरदारीच्या उपाययोजना बंधनकारक करून सर्व व्यापार सुरू करून व्यापाऱ्यांना आर्थिक अरिष्टातून बाहेर काढावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील आरटीपीसीआरचा रेट दहाच्या आत येत आहे. त्यामुळे येत्या सोमवार (ता. १९) पासून शहरातील सर्व दुकाने उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक न होता गेले १०० दिवस पाळलेला संयम आणखी दोन ते तीन दिवस पाळावा, असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले आहे. शासनाकडूनच सोमवारी दुकाने उघडण्यास परवानगी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

loading image