अंबाबाईच्या मुर्तीवर मावळतीच्या सूर्यकिरणांचा अभिषेक  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur ambabai kirnotsav sohla last day

किरणोत्सवादरम्यान एक ढग आडवा आला. पण, काही काळातच तो बाजूला गेला आणि किरणोत्सव पूर्ण क्षमतेने साजरा झाला

अंबाबाईच्या मुर्तीवर मावळतीच्या सूर्यकिरणांचा अभिषेक 

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी आज मावळतीच्या सूर्यकिरणांनी श्री अंबाबाईच्या मुर्तीवर अभिषेक घातला. सायंकाळी पाच वाजून 44 मिनिटांपासून सलग चार मिनिटे हा नयनरम्य सोहळा यानिमित्ताने अनुभवता आला. 

दरम्यान, किरणोत्सवादरम्यान एक ढग आडवा आला. पण, काही काळातच तो बाजूला गेला आणि किरणोत्सव पूर्ण क्षमतेने साजरा झाला. देवीच्या मुर्तीच्या किरीटापासून ते चरणापर्यंत संपूर्ण मुर्ती लख्ख सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली. 

हे पण वाचाकोल्हापूर - ट्रकच्या केबिनमधून ३३ लाखांची चोरी

महाव्दार कमानीजवळ पाच वाजता सूर्यकिरणे आली. त्यानंतर सहा मिनिटांनी गरूड मंडपात किरणे आली. पाच वाजून सतरा मिनिटांनी चौथऱ्यापर्यंत त्यानंतर पाच वाजून 32 मिनिटांनी कासव चौकात, पाच वाजून 37 मिनिटांनी पितळी उंबरा, पाच वाजून 43 मिनिटांनी कटांजन असा प्रवास करत पाच वाजून 44 मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला. पुढे चार मिनिटे संपूर्ण मुर्तीवर किरणांनी जणु अभिषेकच घातला, अशी माहिती प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top