ज्येष्ठांसह गर्भवतींना अंबाबाई दर्शनाची मुभा | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : ज्येष्ठांसह गर्भवतींना अंबाबाई दर्शनाची मुभा

कोल्हापूर : ज्येष्ठांसह गर्भवतींना अंबाबाई दर्शनाची मुभा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक व गर्भवतींना अंबाबाई मंदिरासह इतर धार्मिक व प्रार्थनास्थळांवर भेट देण्याची मुभा दिली आहे. याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी दिली.

कोरोना पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे दर्शनासाठी बंद होती. घटस्थापनेच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गर्भवतींना प्रवेशास बंदी होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे आजपासून ज्येष्ठ नागरिक व गर्भवतींना दर्शनास मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

हेही वाचा: नाशिक : सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी मंदिर रात्री दहापर्यंत खुले

दोन डोस झालेल्या गर्भवती आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना दर्शन घेता येणार असले, तरी डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे. याचबरोबर या नागरिकांना ई-पास बंधनकारक असून मास्क, सोशल डिस्टन्सचा वापर, प्रवेशावेळी थर्मल स्क्रिनिंग असे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे असल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी सांगितले. दरम्यान, दहा वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेशाबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने लहान मुलांना दर्शन घेता येणार नाही.

loading image
go to top