सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी मंदिर रात्री दहापर्यंत खुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्तशृंगीमातेच्या

नाशिक : सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी मंदिर रात्री दहापर्यंत खुले

वणी : दीपावलीच्या सुट्टयांची पर्वणी साधत धार्मिक पर्यटनासाठी सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे मंदिराची वेळ वाढवण्यात आली असून आता रात्री दहापर्यंत भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

दिवाळीच्या सुट्यांमुळे महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून सप्तशृंगीगडावर भाविकांचा ओघ वाढला आहे. यात बहुतांशी भाविक गुजरात राज्यातून त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवात सहभाही होण्यासाठी पदयात्रेने जात आहेत, ते प्रथम आदिमायेचे दर्शन घेऊन शिर्डीकडे रवाना होतात.

हेही वाचा: नाशिक : बारावी परीक्षेसाठी आजपासून भरता येणार अर्ज

भाविकांची गर्दी लक्षात घेता दिवाळीच्या सुट्टीत मंदिरांची वेळ दरवर्षी वाढविण्यात येते. त्यानुसार संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी मंदिर हे रात्री दहापर्यंत उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मंदिर पहाटे ५ ते रात्री १० दरम्यान दर्शनासाठी खुले असणार आहे. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे, असे आवाहन विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर यांनी केले आहे.

loading image
go to top