2.12 lakh devotees visited Ambabai temple in two days
esakal
कोल्हापूर : दिवाळी सुटीचा शेवटचा रविवार असल्याने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. दोन दिवसांत दोन लाख १२ हजार ५१४ भाविकांनी दर्शन घेतले. शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व ऐतिहासिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी होती. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी (Rankala Lake tourist rush during Diwali vacation) झाली.