Kolhapur Ambabai Temple musical lights not working
esakal
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय राहावे, या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ध्वनियंत्रणायुक्त (म्युझिकल) विजेच्या खांबांमधून देवीचे सूर गायब झाले (Kolhapur Navratri festival latest news) आहेत. वर्षभर नाही, तर निदान नवरात्रोत्सवात तरी या खांबांवरून भक्तिगीते ऐकायला मिळतील, अशी भाविकांची अपेक्षा होती; मात्र उत्सव सुरू असतानाही हे खांब पूर्णपणे शांत असल्याने, ‘नवरात्रातच गाणी वाजणार नसतील तर हे खांब हवेत कशाला?’’ असा संतप्त सवाल भाविक व पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.