Kolhapur Navratri crowd management issues
esakal
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दारात भाविकांचाच छळवाद मांडला गेला. प्रशासनाच्या अवाजवी व अव्यवहार्य नियोजनाचा मोठा फटका भाविकांना (Ambabai temple darshan problems in Kolhapur) बसला. जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अजब कारभारामुळे भाविकांना मंदिर प्रांगणात साधी प्रदक्षिणाही घालता आली नाही. तसेच इतर मंदिरांचे दर्शन घ्यायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.