Kolhapur Ambabai Temple
esakal
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात श्री पुजाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिरात पुजारी आणि देवस्थान समिती यांच्यातील वाद उफाळून आल्याने धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले (Kolhapur Ambabai Temple religious rituals dispute) आहे. देवस्थान समितीच्या कारभाराविरोधात पुजारी आक्रमक झाले असून, धार्मिक कार्यात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.