

Ambabai Temple security breach
esakal
Devotee Enters Temple With Pistol: एकीकडे भाविकांची मोठी गर्दी असताना एका भाविकाने आज अंबाबाई मंदिरात थेट पिस्तूल घेऊन प्रवेश केला. मंदिरातील मेटल डिटेक्टर कुचकामी असून, मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केला. मुंबईचे भाविक राहुल चतुर्वेदी, संभाजी साळुंखे यांनी हा प्रकार मंदिर व पोलिस प्रशासनासमोर आणला. दरम्यान, याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशीचे काम सुरू होते.