

Annual Credit Plan Performance
sakal
कोल्हापूर : ‘जिल्ह्याच्या वार्षिक पतआराखड्यांतर्गत सप्टेंबरअखेर सर्व बँकांची मिळून ११८ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे’, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी येथे दिली. तसेच एक एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरणात सर्व बँकांनी मिळून ९९ टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले.