कोल्हापूर : आयपीएलसह (IPL) विविध फॉर्मेटमधील क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळाडू म्हणून तमाम भारतीयांच्या गळ्यातील ताईत विराट कोहलीचा (Virat Kohli) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्यावरील प्रेमापोटी अभियांत्रिकेचे धडे गिरवणाऱ्या संकेत पाटील याने विराटचा व्हिडिओ पाहून त्याच्यावर ‘द वन परसेंट थेअरीः बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बेलीफ’ हे ६१ पानी पुस्तक लिहिले आहे. त्याची प्रकाशनपूर्व प्रत त्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना भेट दिली.