पूरस्थितीची माहिती एका क्लिकवर
पूरस्थितीची माहिती एका क्लिकवरsakal

कोल्हापूर :पूरस्थितीची माहिती एका क्लिकवर

घटना प्रतिसाद प्रणाली’चा फायदा

कोल्हापूर : पूरग्रस्त गावे, पाण्याखाली आणि वाहतुकीसाठी सुरक्षित असणारे रस्ते, आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालये, रेल्वेस्थानक, विमानतळ, हेलिकॉप्‍टर उतरता येईल अशी जागा, शासकीय दवाखाने यांसह जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्तीच्या घटना व यासाठी लागणारी मदतीची माहिती ‘घटना प्रतिसाद प्रणाली’द्वारे (Incident Command System) मिळणार आहे. जिल्ह्यात या पावसाळ्यापासून या प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थितीची माहिती केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर कोल्हापुरात येणार इतर राज्यातील प्रवासी व वाहतूकदारांनाही समजणार आहे.

जिल्ह्यात २००५ नंतर २०१९ व २०२१ मध्ये महापूर आला. प्रत्येक वर्षी पावसाने आपले रेकॉर्ड मोडित काढले आहेत. यामध्ये शेती, उद्योग, व्यवसायासह पडझडीमुळे अनेक लोकांचे नुकसान झाले. जिल्ह्याला पुराने विळखा घातलेला असतो, अशावेळी सर्वसामान्य लोकांसह इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये आलेल्या वाहतूकदार व नागरिकांना कोणते रस्ते बंद आहेत किंवा सुरू आहेत याची माहिती नसते. महामार्गावर पाणी आल्याने परराज्यातील वाहने आठवडा-आठवडाभर महामार्गावर अडकून पडतात. या दरम्यान एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याला औषधोपचार घेण्यासाठी कोठून जावं, काय करावे हे समजत नाही. एखादे गाव पूर्ण पाण्यात जात असेल तर तेथील लोकांसह आजू-बाजूच्या गावातील लोकांना माहिती मिळावी, या हेतूने ‘घटना प्रतिसाद प्रणाली’ ही वेबसाईट काम करणार आहे. कोल्हापूरमधील अशी सर्व माहिती या प्रणालीवर अपलोड केली जात आहे.

पूरस्थितीत एखाद्या गावचा संपर्क तुटला, अचानक पाणी वाढले, रस्ता खचला असेल तर याची माहिती वेळोवेळी अपलोड केली जाणार आहे. याशिवाय, यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी दरड कोसळली, धोकादायक दरडी कोणत्या, पुराची आणि पावसाची तीव्रता किती असणार याची इत्यंभूत माहिती या वेबसाईटवर असणार आहे.

आरोग्याची माहितीही...

जिल्ह्यात एकूण किती रुग्णालये आहेत. पूरस्थितीत कोणती रुग्णालये चोवीस तास उपचारांसाठी उपलब्ध असतात. त्या रुग्णालयात जाण्याचा मार्ग कोणता, तिथे असणारे डॉक्‍टर कोण, याचीही माहिती असणार आहे.

जिल्ह्यात पूरस्थितीची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे. रविवार (ता. १) पासून जिल्ह्यात ही प्रणाली कार्यरत राहील. यामध्ये सर्व माहिती दिली जाईल. ‘घटना प्रतिसाद प्रणाली’द्वारे (Incident Command System) मिळणारी माहिती नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.

- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com