कोल्हापूर : नानीबाई चिखलीतील केळीच्या बागेत 2 गवे दिसल्याने खळबळ

दीड-दोन वर्षांपूर्वी गवा रेडा गावात प्रथमच येत त्याने धुमाकूळ घातलेला होता.
नानीबाई चिखलीतील केळीच्या बागेत 2 गवे दिसल्याने खळबळ
नानीबाई चिखलीतील केळीच्या बागेत 2 गवे दिसल्याने खळबळSakal
Updated on: 

नानीबाई चिखली : येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण चाबुकस्वार यांच्या केळीच्या बागेत गवे रेडे बसल्याचे पहायला मिळाले. दीड-दोन वर्षांपूर्वी गवा रेडा गावात प्रथमच येत त्याने धुमाकूळ घातलेला होता. त्यावेळच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच आज गावात पुन्हा दोन गवा रेडे आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

प्रवीण चाबुकस्वार हे कामानिमित्त दुपारी अडीच वाजता शेताकडे गेले होते. या वेळी केळीच्या बागेत फेरफटका मारत असताना त्यांना केळीच्या बागेतील सरीत गवा रेडा निवांत बसल्याचे निदर्शनास आले. तात्काळ त्यांनी याबाबतची माहिती शेतमजुरांना दिली व त्यापासून लांब राहण्याचे आवाहन करतानाच ग्रामपंचायतीला देखील माहिती दिली.

नानीबाई चिखलीतील केळीच्या बागेत 2 गवे दिसल्याने खळबळ
मोदींची 12 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, काय घडले बैठकीत ?

दरम्यान ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले यांनी गावात गवा रेडा आल्याची माहिती तात्काळ परिमंडळ वन अधिकारी बळवंत शिंदे यांना दिली. यावेळी शिंदे व त्यांची टीम चिखलीकडे रवाना झाली आहे. गावात पुन्हा एकदा गवा रेडा आल्याची बातमी क्षणार्धात गावभर झाल्याने गवा रेड्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडालेली आहे.

केळीच्या बागेत पहायला मिळालेल्या दोन गवा रेड्यांमध्ये एक गवा पूर्ण वाढ झालेला असून दूसरा लहान असल्याचे समजते. यामुळे बागेत आणखीही गवे असल्याची चर्चा होत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com