ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीचे सार्थक; भटक्या विमुक्तमधून स्मिता गवळींची बाजी l KDCC Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smita Gavli

ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीचे सार्थक; स्मिता गवळींची बाजी

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (KDCC Bank Elections Result) निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती गटातून सत्तारूढ गटाच्या सौ. स्मिता युवराज गवळी (Smita Gavli) विजयी झाल्या, त्यांनी या गटातील उमेदवार व ‘गोकुळ’ चे माजी संचालक विश्‍वास जाधव (Vishwas Jadhav) यांचा मोठा मताधिक्यांनी पराभव केला. सौ. गवळी यांना ४ हजार ८८७ तर जाधव यांना २४९५ मते मिळाली. (Kolhapur District Bank Election 2022)

हेही वाचा: KDCC Result : यड्रावकर, गायकवाड आमच्यासोबतच; मंडलिकांचा दावा

सौ. गवळी ह्या पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांचे कार्यकर्ते युवराज गवळी यांच्या पत्नी आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत त्या बिनविरोध विजयी झाल्या होत्या, पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या निवडणुकीत ऐनवेळी पालकमंत्री पाटील यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्यात त्यांनी बाजीही मारली. त्यांच्या रूपाने जिल्हा बँकेत सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top