

Bank employees stage protests during the nationwide strike demanding a five-day work week.
sakal
कोल्हापूर : देशातील बँकिंग क्षेत्रासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा, या प्रमुख मागणीसाठी संयुक्त बँक कर्मचारी संघटनांनी आज देशभरात ऑल इंडिया bankingबँक संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली या संपात सार्वजनिक बँक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपामुळे जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातील सुमारे ३५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.