Bhudargad Fort wall collapse news
esakal
गारगोटी (जि. कोल्हापूर) : ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही अवघ्या दोन वर्षांत किल्ल्याच्या प्रवेशमार्गाच्या डाव्या बाजूची सुमारे ५० फूट लांबीची तटबंदी कोसळल्याने संताप व्यक्त होत (Bhudargad Fort conservation work) आहे. संवर्धनाच्या कामाचा दर्जा, ठेकेदाराची कार्यपद्धती आणि पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी मोठा निधी खर्च होत असताना तटबंदी अल्पावधीतच ढासळल्याने संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी इतिहासप्रेमी, गडप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.