
कोल्हापूर : सरत्या वर्षातील कटू अनुभवांना तिलांजली देत मंगळवारी मध्यरात्री कोल्हापूरकर जल्लोषातच नववर्षाचे स्वागत करणार आहेत. विविध ठिकाणी सहकुटुंब स्नेहभोजनाचे आयोजन होणार असून, शहरातील महापालिकेची उद्याने रात्री बारापर्यंत सर्वांसाठी खुली राहणार आहेत. दरम्यान, विविध हॉटेल्स, फार्म हाऊसेसही सज्ज असून, ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर झाल्या आहेत. एकीकडे सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप दिला जात असताना विविध सेवाभावी संस्थांतर्फे सामूहिक दुग्धपान, बंदोबस्तावरील पोलिसांसाठी चहा व जेवणाची व्यवस्था आदी उपक्रमही होणार आहेत.