'आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही बिल्डरला मारहाण केलेली नाही'

kolhapur bjp answer to shiv senas criticizes
kolhapur bjp answer to shiv senas criticizes
Updated on

कोल्हापूर - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही बिल्डरला मारहाण केलेली नाही, कोणत्याही डॉक्‍टरकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली नाही. कोणत्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले नाहीत. त्यामुळे तुम्हीच केलेल्या कु-कर्माचे फळ म्हणून जनतेनेच तुम्हाला घरी बसवले आहे. यामध्ये तुमचे सध्याचे शहर प्रमुख जे सुशिक्षित, सोज्वळ, सभ्य अशी ज्यांची शहरात प्रतिमा आहे त्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे, असा टोला भाजपाने पत्रकाद्वारे दिला आहे. 

श्री. पाटील यांच्या सारख्या व्यक्तीमत्वाच्या विरोधात बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मातोश्रीच्या जवळ जाण्यासाठी शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत स्पर्धेचा हा परिपाक आहे. त्यांच्या या स्वार्थी अंतर्गत स्पर्धेमध्ये भाजपाला कोणतेही स्वारस्य नाही. श्री. पाटील हे दोन वेळा पुणे पदवीधर मतदार संघातून आमदार झालेत. यामध्ये तालुके व जिल्हे समाविष्ट आहेत. त्यामध्ये कोल्हापूर देखील आहे याची माहिती करून घ्या, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

श्री. पाटील यांच्याबद्दल बोलताना तथाकथित तसेच स्वत:हून धर्मवीर ही पदवी लावून घेतलेल्या माजी आमदारांनी जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगायला पाहिजे होती. गेल्या दहा वर्षात माजी आमदारांनी शहरातील सर्व सामान्य नागरिक, डॉक्‍टर्स, कारखानदार, बिल्डर्स, उद्योजक इतकेच नव्हे तर पत्रकारांनाही त्यांच्या मनगटातील ताकद दाखवली व त्यामुळेच आपला या निवडणुकीत दारुण पराभव झाला, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

या पराभवामुळे आपले मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे वारंवार आपण अनेकांवर तोंडसुख घेत आहात. परंतु यातून तुमचीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या लेखी कमी होत आहे हे आधी समजून घ्यावे. "जल बीन मछली' याचा अनुभव श्री. इंगवले यांनी कधी काळी घेतलेला दिसतो, तरी अशा वाचाळ विराला अर्थवीराने वेळीच लगाम घालावा, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com