

Chandrakant Patil felicitates newly elected
sakal
कोल्हापूर : ‘तुम्ही आता निवडून आला आहात, मात्र आता पक्षाला विसरू नका. पक्षाचे नेते -पदाधिकारी यांच्याबद्दल वाईट बोलू नका. जनतेचे काम करा. पक्ष संघटनेचा विस्तार करा,’ असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना केले. मंत्री पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.