
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव कमी झाला असून शनिवारी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्यात आलीय. मात्र यानंतरही पाकिस्तानकडून सीमेवर आगळीक सुरूच आहे. दरम्यान, कोल्हापुरातल्या एका शाळकरी मुलाच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात पाकिस्तानबाबत त्यानं रांगड्या भाषेत केलेली टीका चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेनं मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रसंधी झालीय.