Kolhapur News: बांधकाम व्यावसायिकाला १८ कोटींचा गंडा ;गुप्तचर अधिकारी असल्याचे भासवले ;अभिजित आंदळकरसह सहा जणांवर गुन्हा

Kolhapur Builder Fraud, : भारतीय गुप्तचर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून अणू चाचण्यांशी संबंधित दुर्मिळ धातू विकण्याचे आमिष दाखवत कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकाची १८ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
Police investigate an alleged Rs 18.5 crore fraud involving a Kolhapur-based builder.

Police investigate an alleged Rs 18.5 crore fraud involving a Kolhapur-based builder.

sakal
Updated on: 

कोल्हापूर: भारतीय गुप्तचर विभागाने अणू चाचण्यांसाठी लागणारा धातू जप्त केला असून तो विकण्याच्या बहाण्याने तसेच जमीन व्यवहारातून कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकाला १८ कोटी ५० लाखांना गंडा घालण्यात आला. फसगत झालेल्या व्यावसायिकाचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाल्याने त्यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी अभिजित गणपतराव आंदळकर (रमणमळा, सध्या रा. प्रभात रोड, पुणे) याच्यासह सहा संशयितांवर गुन्हा दाखल झाला. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन संबंधित व्यावसायिकाला बनावट शास्त्रज्ञांचीही भेट घालून दिल्याचे चौकशीत समोर येत आहे.

Loading content, please wait...