Kolhapur Police : कोल्हापुरात आरामबस एजंटांकडून पोलिस अधिकाऱ्याला कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण; तिघांवर गुन्हा

Kolhapur Police : याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विशाल दशरथ मुळे यांनी तिघांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात (Shahupuri Police Station) फिर्याद दिली.
esakal
esakal
Updated on
Summary

भरचौकातील हा प्रकार पाहून प्रवाशांसह एजंट, कामगार जमले. गर्दीचा फायदा घेत तीनही संशयितांनी मुळे यांच्या डोक्यात, कानावर, पायावर, पाठीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक (Kolhapur Bus Stand) परिसरातून निघालेल्या सहायक पोलिस निरीक्षकाला पुण्याचे तिकीट खपविण्याच्या फंदात हात पकडून पुण्याच्या बसकडे नेण्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. याला विरोध केल्याने संबंधित आरामबस तिकीट एजंटाने (Bus Agent) हुज्जत घालत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. त्याच्या दोन साथीदारांनी केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com