Who is Mahesh Turbatmat and What is the Case?
esakal
गडहिंग्लज (कोल्हापूर) : अनुसूचित जातीच्या दाखल्याबाबत पोलिस दक्षता पथकाने दिलेल्या तपासणी अहवालानुसार येथील पालिकेचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बेडा जंगम जातीचा दावा का फेटाळण्यात (Kolhapur Caste Certificate Verification) येऊ नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच याबाबत लेखी खुलासा व अधिकचे पुरावे मंगळवारच्या (ता. ७) सुनावणीवेळी सादर करण्याची सूचनाही त्यांना याच नोटिसीतून केली आहे.