Dajipur Sanctuary Rain
esakal
कोवाड (कोल्हापूर) : दाजीपूर अभयारण्य (Dajipur Sanctuary Rain), माणगाववाडी व लकिकट्टे (ता. चंदगड) परिसरात काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार पावसाने सर्वत्र एकच धावपळ उडाली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचा अंदाज न आल्याने शेतकरी शेतीकामात मग्न होता. अचानक ढगांचा गडगडाट करत पावसाच्या सरी कोसळू लागल्याने सर्वांची धावपळ उडाली.