Chandgad News
esakal
चंदगड (कोल्हापूर) : शहरात सोमवारी मध्यरात्री रवळनाथ मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारापर्यंत गव्याच्या पिल्लाने संचार केला, तर पार्ले ( ता. चंदगड) येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळून हत्तीने फेरफटका (Chandgad News) मारला. वनहद्दीजवळ शेतशिवारातून वावरणारे वन्यप्राणी आता मानवी वस्तीपर्यंत येऊ लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.