Youth Beaten Cigarette : पेटते सिगारेट अंगावर टाकली, जाब विचारायला जाताच तरुणाला चोपला; कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Cigarette Attack Youth : कोल्हापुरात पेटती सिगारेट अंगावर टाकल्यानंतर जाब विचारायला गेलेल्या तरुणाला मारहाण करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Youth beaten after cigarette thrown on him Kolhapur

Youth beaten after cigarette thrown on him Kolhapur

esakal

Updated on

Youth Beaten After Cigarette Attack : पेटते सिगारेट अंगावर का टाकलास असे विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करुन डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याप्रकरणी येथील पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शैलेशकुमार उदय माळी (रा. माणकापूर, ता. चिकोडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (ता २४) शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील दर्ग्याजवळ ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com